आमचं काम
२०१७ पासून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि ग्रामीण महाराष्ट्रातील गावांमध्ये सहा कार्यक्षेत्रं. प्रत्येकात आम्ही काय करतो, ते कसं चालतं आणि तुम्ही कशी मदत करू शकता. प्रत्येक क्षेत्राचं सविस्तर पान खालील दुव्यांवर.
शाळेत शुद्ध पाणी, रोज
शाळांमध्ये RO आणि UV युनिट, ५०० लिटरची टाकी आणि पहिल्या वर्षाची देखभाल खर्चातच धरलेली. शिवाय महिला आणि कुटुंबांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि जनजागृती शिबिरं.
- शाळेचा अर्ज → जागेची पाहणी → बसवणं → दर तीन महिन्यांनी देखभाल. मंजुरीपासून ४ ते ६ आठवडे.
- रक्तदाब, हिमोग्लोबिन, साखर, स्त्रीरोग सल्ला आणि पुढील उपचारासाठी संदर्भ.
एका शाळेचं युनिट: ₹[रक्कम] · एक आरोग्य शिबिर: ₹१०,०००
तुमच्या शाळेला युनिट हवंय? आम्हाला कळवा.
एक मंच, एक शिबिर, एक संघ
८ मार्च २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे "सौंदर्यकन्या आणि सौभाग्यवती मी पुण्याची" मध्ये झोपडपट्टी ते गाव, किशोरी ते ज्येष्ठ अशा २००+ महिलांनी सहभाग घेतला. ग्रूमिंग सत्र, मोफत भोजन, नगरसेविकांच्या हस्ते सत्कार. कोणाकडूनही शुल्क नाही.
- आमच्या आवारात महिलांसाठी क्रीडा स्पर्धा: म्युझिकल चेअर, चमचा-लिंबू, चेंडू फेक.
- महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरं.
एक दिवसाचं सशक्तीकरण शिबिर: ₹२०,००० · पुढील आवृत्ती: [महिना २०२७]
प्रत्येक मूल आणि प्रत्येक स्त्री शिकेल
गावांमध्ये आरोग्य, स्वच्छता, पोषण, मुलींचं शिक्षण, व्यसनमुक्ती आणि नागरिकांचे हक्क यांवर जनजागृती सत्रं. शिक्षण अर्धवट राहिलेल्या महिलांसाठी साक्षरता वर्ग, बँक व UPI वापर, बचत गटांचा हिशेब, मोबाइलचा सुरक्षित वापर आणि कायदेविषयक माहिती. सविस्तर वाचा
शिक्षण हा मानवी विकासाचा पाया. दुर्बल घटकांतील मुलं आणि विशेष गरजा असलेली मुलं आमची प्राथमिकता. १४ एप्रिल २०२३ रोजी कोथरूडच्या विशेष मुलींच्या निवासी शाळेत आम्ही गाणी गायली, खाऊ वाटला आणि मैत्री केली.
- शाळांमध्ये शुद्ध पाणी आणि शैक्षणिक साहित्य.
- २०२७ साठी नियोजित: प्रशिक्षित मार्गदर्शकासह दरमहा समावेशक शिक्षण उपक्रम.
एका सत्राचा खाऊ आणि साहित्य: ₹२,०००
चार गायी, रोजची काळजी
कोथरूड येथील आमच्या आवारात न्यासाने विकत घेतलेल्या चार गायींची गोशाळा. रोज हिरवा आणि सुका चारा, स्वच्छ पाणी, सावली आणि पशुवैद्यकीय तपासणी. याच आवारातून वृक्षारोपण मोहिमा.
एक महिना, एक गाय: ₹[रक्कम] · बांधकाम: ₹१,००,००० · वाहन: ₹५,००,०००
गोशाळेला भेट द्यायची आहे? वेळ ठरवा.
दवाखाना दूर, तिथे डॉक्टर
गावात डॉक्टरकडे जाणं म्हणजे बसचा प्रवास, रांग आणि एका दिवसाची मजुरी. म्हणून लोक थांबतात, आणि रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय, मोतीबिंदू आजार गंभीर होईपर्यंत लक्षात येत नाहीत.
- सर्वसाधारण तपासणी; रक्तदाब, साखर आणि हिमोग्लोबिन चाचणी.
- डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी संदर्भ.
- महिलांसाठी आरोग्य सल्ला; डॉक्टरांनी लिहून दिलेली मूलभूत औषधं मोफत.
- सरकारी रुग्णालयात संदर्भ आणि नंतर फोन करून पाठपुरावा.
तुमच्या गावात शिबिर हवं आहे? 93705 26828 वर फोन किंवा WhatsApp करा. सविस्तर वाचा
अन्नदात्यासोबत उभे
सांगली आणि सोलापूरचा दुष्काळी पट्टा, कृष्णा-पंचगंगाकाठचे पूर: एक वाईट हंगाम पाच चांगल्या हंगामांची कमाई घालवतो. योजना कागदावर आहेत, पण अर्ज, कागदपत्रं आणि मुदती अनेकांना बाहेर ठेवतात.
- सरकारी योजनांसाठी मदत केंद्र: माहिती, अर्ज आणि पाठपुरावा, पूर्णपणे मोफत.
- ठिबक सिंचन, शेततळी, आच्छादन आणि जलस्रोत संरक्षणाबद्दल जनजागृती.
- कंपोस्ट आणि शेण-गोमूत्रावर आधारित सेंद्रिय, कमी खर्चाची शेती.
- महिला शेतकऱ्यांसाठी हक्क, गट आणि बचत सत्रं; दुष्काळ-पुरानंतर मदत आणि दावे.
जेवण, घोंगडी आणि सन्मानाकडे परतीचा मार्ग
पत्ता नसेल तर रेशनकार्ड नाही, आधार नाही, पेन्शन नाही, आणि अनेकदा उपचारही नाहीत. फक्त अन्न पुरेसं नाही; कागदपत्रं आणि संपर्कही तितकेच महत्त्वाचे.
- संध्याकाळी नियमित अन्नवाटप; हिवाळा व पावसाळ्याआधी घोंगडी आणि कपडे वाटप.
- आरोग्य तपासणी आणि गंभीर आजारींना रुग्णालयात संदर्भ.
- आधार, रेशनकार्ड आणि पेन्शनसाठी मदत; निवारागृह आणि शक्य तिथे कुटुंबाशी संपर्क.
परवानगीशिवाय कोणाचाही चेहरा फोटोत नाही, कधीही. सविस्तर वाचा
दया नव्हे, स्वावलंबन
गावातील अनेक वृद्धांची दृष्टी मोतीबिंदूमुळे जाते, जी एका छोट्या शस्त्रक्रियेने परत येऊ शकते. जन्मापासून दृष्टिहीन व्यक्तींसाठी अडथळे रोजचे आहेत: ब्रेल पुस्तकं कमी, परीक्षेसाठी लेखनिक नाही, प्रमाणपत्रं आणि पेन्शन मिळवणं अवघड.
- शिबिरांत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी संदर्भ आणि चष्मे.
- ब्रेल पुस्तकं, ऑडिओ शिक्षण आणि परीक्षेसाठी स्वयंसेवक लेखनिक.
- पांढरी काठी, हालचाल प्रशिक्षण, UDID प्रमाणपत्र व पेन्शनसाठी मदत, स्क्रीन-रीडरसह संगणक प्रशिक्षण.
पुढे टिकणारं काही उभं करायचं आहे
- कचरा व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी: शुद्ध पाणी हा प्रत्येकाचा हक्क आहे. ग्रामपंचायती आणि शाळांसोबत कचरा वर्गीकरण, कंपोस्ट, प्लास्टिक संकलन आणि प्रत्येक शाळेत पिण्याचं शुद्ध पाणी.
- शाळा: ग्रामीण मुलांसाठी घराजवळ पूर्ण शिक्षण देणारी शाळा, मुली आणि दिव्यांग मुलांकडे विशेष लक्ष.
- आरोग्यसेवा: ठरलेल्या वेळापत्रकाने गावांत जाणारा फिरता आरोग्य दवाखाना, आणि पुढे एक ग्रामीण दवाखाना.
- पर्यावरण संवर्धन: जलस्रोतांचं संरक्षण, शेतीतील रसायनं कमी करणं आणि पशुपालनावर आधारित नैसर्गिक शेती.
- वृक्षारोपण: देशी, सावली आणि फळझाडं; प्रत्येक झाड एखादं कुटुंब किंवा वर्ग दत्तक घेईल.
- आणि इतर: युवक आणि महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण, मोठी गोशाळा आणि गावं मागतील ते उपक्रम.
तुम्हाला ज्यासाठी द्यायचं, ते निवडा.
पावती ४८ तासांत, 80G करमुक्त, आणि तुमच्या देणगीतून काय घडलं त्याचा फोटो.